BJP Jan Ashirwad Yatra | भागवत कराड पंकजा मुंडेच्या घरी, समर्थकांची जोरदार घोषणाबाजी

BJP Jan Ashirwad Yatra | भागवत कराड पंकजा मुंडेच्या घरी, समर्थकांची जोरदार घोषणाबाजी

| Updated on: Aug 16, 2021 | 11:35 AM

पंकजा मुंडे यांच्या घरासमोर मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. भागवत कराड दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांची जनआशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad yatra) आजपासून (16 ऑगस्ट) सुरु होत आहे. ही यात्रा बीडमधील परळीच्या गोपीनाथ गडावरुन (Gopinath Gad) निघणार आहे. तत्पूर्वी आज सकाळी साडे नऊच्या सुमारास भागवत कराड पंकजा मुंडे यांच्या घरी पोहोचले. पंकजा मुंडे यांनी भागवत कराड यांचं स्वागत केलं. परंतु पंकजा मुंडे यांच्या घरासमोर मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. भागवत कराड दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

परळीच्या गोपीनाथ गडावरून केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेला थोड्याच वेळात सुरवात होणार आहे. स्वतः पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यात सहभागी होणार आहेत. दरम्यान काही वेळातच या यात्रेचा शुभारंभ गोपीनाथ गडावर होणार असून त्याचीच तयारी सध्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळी सुरु आहे.

Published on: Aug 16, 2021 11:35 AM