केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड एका कॅमेरामनसाठी ठरले देवदूत! भोवळ येऊन बेशुद्ध पडल्यावर कराडांनी दिले प्रथमोपचार

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड एका कॅमेरामनसाठी ठरले देवदूत! भोवळ येऊन बेशुद्ध पडल्यावर कराडांनी दिले प्रथमोपचार

| Updated on: Jun 17, 2022 | 10:15 PM

दिल्लीत एका टीव्ही कार्यक्रमात भागवत कराड सहभागी झाले होते. त्यावेळी एका कॅमेरामनला अस्वस्थ वाटू लागलं आणि तो चालू कार्यक्रमातच बेशुद्ध होऊन कोसळला. त्यावेळी भागवत कराड यांनी पुढे होऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार केले.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे पेशानं डॉक्टर आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेरणेतून ते राजकारणात आले. महापौर ते केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पदापर्यंतचा त्यांचा प्रवास कौतुकास्पद आहे. आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून संपूर्ण देशात आपला ठसा उमटवत असतानाच त्यांच्यातील डॉक्टर त्यांनी कधीही बाजूला केला नाही. त्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. दिल्लीत एका टीव्ही कार्यक्रमात भागवत कराड सहभागी झाले होते. त्यावेळी एका कॅमेरामनला अस्वस्थ वाटू लागलं आणि तो चालू कार्यक्रमातच बेशुद्ध होऊन कोसळला. त्यावेळी भागवत कराड यांनी पुढे होऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. कराड यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Published on: Jun 17, 2022 10:15 PM