VIDEO : रावसाहेब दानवेंच्या ग्राऊंडवर भागवत कराड यांचं भाषण

VIDEO : रावसाहेब दानवेंच्या ग्राऊंडवर भागवत कराड यांचं भाषण

| Updated on: Aug 20, 2021 | 9:37 AM

भागवत कराड यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरुन कौतुक केले. मंत्री झाल्यानंतर आपणास जन आशीर्वाद यात्रा काढण्यास सांगितल्याने आपण ही यात्रा काढल्याचे कराड यांनी सांगितले.

जालना : केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा काल जालन्यात होती. यावेळी भागवत कराड यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरुन कौतुक केले. मंत्री झाल्यानंतर आपणास जन आशीर्वाद यात्रा काढण्यास सांगितल्याने आपण ही यात्रा काढल्याचे कराड यांनी सांगितले. कराड यांनी मोदींनी देशात केलेल्या कामाची यादीच वाचून दाखवली.  तर जालन्याचे भाजप खासदार रावसाहेब दानवे अर्थात दाजी यांनी आपल्या खास शैलीत भाषण केले. जर मी आमदार, खासदार, मंत्री झालो नसतो, तर जवखेडा या त्यांच्या गावी मारोती मंदिरात हरिपाठ करत बसलो असतो, अशी टोलेबाजी रावसाहेब दानवे यांनी केली.