यूक्रेन रशिया युद्धाचा भारतावर परिणाम होणार : भागवत कराड
यूक्रेन-रशिया युद्धाचा देशावर परिणाम होणार, येत्या काळात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार, असे केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड म्हणाले आहेत.
यूक्रेन-रशिया युद्धाचा देशावर परिणाम होणार, येत्या काळात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार, असे केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड म्हणाले आहेत. तसेच युक्रेन मध्ये महाराष्ट्रातील जवळपास 1200 विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना परत आणण्याची तयारी सुरू आहे, असेही ते म्हणाले आहेत. आता यूक्रेनवर आक्रमण केल्यास रशियावर निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी दिला. मात्र, त्यांचा इशारा धुडकावत रशियानं यूक्रेनवर हल्ला केला. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. रशियाला रोखणारे कुणीही नाही का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. युक्रेनने कालच भारताकडे मदत मागितली आहे. मात्र केंद्रीय मंत्रालयाकडून अद्याप कोणताही अधिकृत माहिती आलेली नाही. यात भारत काय भूमिका घेणार? आणि युद्धामुळे वाढणारी महागाई कशी रोखणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
Latest Videos