मणिपूर हिंसाचारावरून भाजपच्याच आमदाराचा राजीनामा; काँग्रेस आमदाराने मानले केले कौतुक, म्हणाला…
मणिपूर प्रकरणावरून भाजप नेत्याने पक्षाला घरचा आहेर दिला आहे. भाजपा नेते आणि बिहारमधील पक्षाचे प्रवक्ते विनोद शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कठोर शब्दात टीका करत राजीनामा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते भाई जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 28 जुलै 2023 | मणिपूर प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही मणिपूरच्या प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. विरोधी पक्षांनी मणिपूरच्या विषयावरून संसदेत आक्रमक भूमिका घेतली आहे. असं असताना भाजपा नेते आणि बिहारमधील पक्षाचे प्रवक्ते विनोद शर्मा यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. विनोद शर्मा यांनी पक्षाला राजीनामा देत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते भाई जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “भाजपचे नेते विनोद शर्मा यांचं मी आभार मानतो. त्यांच्यात मोठी हिंमत आहे. आताच्या काळात असं करणं हिंमतीचं काम आहे, त्यामुळे मी त्यांचं कौतुक करतो आणि आभार मानतो. त्यांना माणुसकीचा साक्षातकार झाला आहे. मणिपूर जळत आहे आणि केंद्र सरकारला वेळ नाही आहे.”