अवकाळी पावसानं 702 घरांची पडझड, नापिकीची झळा सोसणाऱ्या या अवकाळीनं शेतकरी 'गार'

अवकाळी पावसानं 702 घरांची पडझड, नापिकीची झळा सोसणाऱ्या या अवकाळीनं शेतकरी ‘गार’

| Updated on: May 06, 2023 | 9:43 AM

VIDEO | महिन्याभरापासून भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा बळीराजाला फटका, तर अनेकांचे संसार उघड्यावर

भंडारा : जिल्ह्यात महिन्याभरापासून अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. दरम्यान 1 ते 3 मे या तीन दिवसांच्या कालावधीत वादळ आणि पावसाची तीव्रता अधिक जाणवल्याने प्रशासनाच्या नोंदीनुसार जिल्ह्यात 702 घरांची पडझड झाली; तर लाखनी तालुक्यात 390.2 हेक्टरमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान लाखांदूर तालुक्यालाही या काळात मोठा फटका बसला असून तेथील पीक नुकसानाची आकडेवारी उपलब्ध झालेली नाही.एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून अवकाळी पावसाच्या संततधारेने पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान लाखनी, लाखांदूर वादळी पावसाने थैमान घातले. रस्त्यावरील झाडे, विजेचे खांब कोसळले. घरावरील टिनाचे शेड, कौलारू छप्पर उडाले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अनेक गावे अंधारात गेली. आधीच नापिकीची झळा सोसणाऱ्या या पावसाने शेतकरी ‘गार’ झाला आहे. सततच्या नापिकीला तोंड देत थकला आहे. सरकारने सावरण्यासाठी मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तीन दिवसांत आलेल्या अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीने उन्हाळी धान, मक्याचे पीक उद्ध्वस्त झाले. यंदा उन्हाळ्यात मार्चपासून अधून-मधून पाऊस सुरू आहे. खरीपनंतर रब्बी हंगामातील पिकांचेही नुकसान होत आहे. अवकाळी पावसाचा मुक्काम आता 7 मे पर्यंत लांबणार आहे.
विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, अशी शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

 

 

Published on: May 06, 2023 09:43 AM