भूषण देसाई यांच्या पक्षप्रवेशावरून शिवसेना नेता स्पष्टच म्हणाला, 'आम्ही घरं फोडत नाही, तर...'

भूषण देसाई यांच्या पक्षप्रवेशावरून शिवसेना नेता स्पष्टच म्हणाला, ‘आम्ही घरं फोडत नाही, तर…’

| Updated on: Mar 13, 2023 | 9:11 PM

VIDEO | उद्धव ठाकरे गटाकडून वारंवार मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर करण्यात येणाऱ्या टीकेवर शिवसेनेच्या नेत्याचा जोरदार पलटवार

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे समोर आले आहे. ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आले आहे. भूषण सुभाष देसाई यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर आता ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून घर फोडण्याचे काम सुरू असल्याची खोचक टीका केली जात आहे. वारंवार करण्यात येत असलेल्या या टीकेवर आता शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी जोरदार पलटवार केला आहे. ‘आम्ही घर फोडण्याचे वगैरे काम करत नसून ज्यांना शिवसेनेचे काम पटते, ज्यांना एकनाथ शिंदे यांचे काम भावते ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर येत आहेत.’, असे भरत गोगावले यांनी म्हटले आहे. भूषण देसाई यांनी स्वतःच्या मनाने आणि एकनाथ शिंदे यांच्या कामाकडे बघून त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याचेही भरत गोगावले यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 13, 2023 09:11 PM