शिंदेंचे आमदार संतोष बांगर यांचे हातवारे अन् काय ते इशारे… नुसते टिकांचे फटकारे
आमदार संतोष बांगर हे यापूर्वी कृती आणि त्यांच्या वक्तव्याने वादात होते. आता हातवाऱ्यांनी त्यांचा लौकीक वाढवलाय. तोंडून शब्दही न काढता चर्चेत राहणं येड्या गबाळ्याचं काम नाही. इतके पैसे, वेळ आणि श्रम खर्च करून शासनाने शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित केला. पण...
मुंबई, १२ मार्च २०२४ : विधानं आणि वादात राहणारे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यावेळी आपल्या हातवाऱ्यांनी वादात सापडले आहेत. त्यांच्या या कृतीचं समर्थन भरत गोगावले यांनी देखील केलेलं नाही. ‘सगळेच शिंदे किंवा भरत गोगावले बनू शकत नाही.’ अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी दिली. आमदार संतोष बांगर हे यापूर्वी कृती आणि त्यांच्या वक्तव्याने वादात होते. आता हातवाऱ्यांनी त्यांचा लौकीक वाढवलाय. तोंडून शब्दही न काढता चर्चेत राहणं येड्या गबाळ्याचं काम नाही. इतके पैसे, वेळ आणि श्रम खर्च करून शासनाने शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाचे फायदे मांडण्याऐवजी बांगर यांनी हातवारे दाखवले. तर अख्या शासन आपल्या दारी कार्यक्रमावर बांगरांचे हातवारे भारी पडले. दरम्यान, यावर गोगावले म्हणाले, ‘सर्वच एकनाथ शिंदे, भरत शेठ होऊ शकत नाही. काही असे तसे थोडे असतात जर असे काही झाले असेल तर त्याला आम्ही चूक सुधारायला लावू. काही उत्साहाच्या भरात काही बोलून जातात जर एखदी चूक झाली तर त्यांनी चार पावले मागे येवून चूक सुधारायला पाहिजे. ‘