Bharat Sasane Exclusive | अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे
उदगीरमध्ये होणाऱ्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कथाकार आणि लेखक भारत सासणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, अशी माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.
उदगीरमध्ये होणाऱ्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कथाकार आणि लेखक भारत सासणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, अशी माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. यापूर्वी नाशिकमध्ये गेल्याच महिन्यात 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी खगोलतज्ज्ञ जयंत नारळीकर होते.
नाशिकमध्ये होणारे साहित्य संमेलन अनेक वादविवादांनी गाजले. मग त्या साहित्य संमेलनाच्या तारखा असो की, साहित्य संमेलनाचे बदललेले स्थळ. आता 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद निवडीसाठी आज रविवारी उदगीरमध्ये बैठक झाली. या बैठकीत ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली, अशी माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. ठाले-पाटील म्हणाले की, सध्या अध्यक्षाचे नाव घोषित केले आहे. थोड्यात वेळात अजून एक बैठक घेऊन तारखांची घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.