भास्कर जाधव यांनी 'या' दिवशी शिंदे गटात घ्या, अशी विनंती केली; भाजप नेत्यानं काय केला गोप्यस्फोट?

भास्कर जाधव यांनी ‘या’ दिवशी शिंदे गटात घ्या, अशी विनंती केली; भाजप नेत्यानं काय केला गोप्यस्फोट?

| Updated on: Feb 27, 2023 | 9:59 PM

VIDEO | भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना तब्बल १०० वेळा फोन केला अन्..., भाजप नेत्यानं काय केला दावा बघा व्हिडीओ

मुंबई : आज विधानसभेत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलाचं धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यानंतर भाजप नेत्यानं मोठा गौप्यस्फोट केल्याचे समोर आले आहे. भास्कर जाधव यांनी शिंदे गटात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला. हा फोन भास्कर जाधव यांनी २२ जूनला केला होता, यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना फोन करून बंडखोर आमदारांमध्ये सामील करून घेण्याची विनंती केली, असा मोठा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. भास्कर जाधव यांनी शिंदे गटामध्ये सामील होण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलेलं होतं.पण भास्कर जाधवांवर विश्वास ठेवता येणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना या आमदारांच्या गटात घेतलं नाही, असेही मोहित कंबोज यांनी म्हटले आहे.