संजय राऊत यांनी कितीही आदळआपट करूदे, भाजप गेंड्याच्या कातडीचं; भास्कर जाधव यांनी डिवचलं
संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात मकाऊच्या कॅसिनोतील आणखी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राऊतांच्या ट्वीटवर भाष्य केले
मुंबई, २४ नोव्हेंबर २०२३ : संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात मकाऊच्या कॅसिनोतील आणखी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राऊतांच्या ट्वीटवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, असे व्हिडीओ जारी करून भाजपला त्याचं सोयर सुतक आहे का? संजय राऊत ठामपणे दावा करतात म्हणजे त्यांच्याकडे नक्की पुरावे आहेत, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. यापूर्वी किरीट सोमय्या यांचे व्हिडिओ सर्व राज्याने पाहिले. त्यांच्यावर कुठे काय कारवाई झाली, असा खोचक सवाल करत भास्कर जाधव यांनी हल्लाबोल केला. तर चंद्रशेखर बावनकुळे कॅसिनोत जुगार खेळतात हे स्पष्ट झालंय. तर राऊत यांनी कितीही आदळआपट केली तरी भाजप कारवाई करणार नाही. कारण भाजप गेंडाच्या कातडीचा पक्ष आहे, असे भास्कर जाधव यांनी संजय राऊत यांच्या नव्या टि्वटनंतर म्हटले आहे.