देव्हाऱ्यात पुजलं जाणारं शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गद्दारांनीच गोठवलं, भास्कर जाधव यांचा हल्लाबोल
ठाकरे गटातील भास्कर जाधव यांची शिंदे गट आणि शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर जोरदार टीका
१९६६ सालापासून धनुष्यबाण हे चिन्ह देव्हाऱ्यात पुजलं जात होतं ते शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गद्दारांनी गोठवलं, असे म्हणत ठाकरे गटातील भास्कर जाधव यांनी शिंदे गट आणि शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. हे ४० गद्दार शिवसेना सोडून गेली तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात पाणी होतं, असेही ते म्हणाले.
दापोली विधानसभा मतदारसंघात भगव्या सप्ताहाला सुरूवात झाली असून सोमवारी याबाबत ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव यांनी माहिती दिली. तेव्हा ते पत्रकारांशी संवाद साधत होते. या संवादादरम्यान भरसभेत योगेश कदम यांच्या दापोली मतदारसंघात शिंदे गटावर निशाणा साधला. या पत्रकार परिषदेत विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई, माजी आमदार सुर्यकांत दळवी, जिल्हा प्रमुख सचिन कदम, युवासेना राज्य कार्यकारणी कोअर कमिटी सदस्य आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव उपस्थित होते.