भास्कर जाधव यांच्याकडून नारायण राणे यांची मिमिक्री, बघा व्हिडीओ
VIDEO | ठाण्यातील शिवगर्जना अभियानात भास्कर जाधव यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडताना केली नारायण राणे यांच्यासह रामदास कदम यांची मिमिक्री
ठाणे : ठाण्यात आज ठाकरे गटाच्या शिवगर्जना अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीचा देखील सक्रिय सहभाग या शिवगर्जना अभियान मेळाव्यात होता. दरम्यान ठाण्यात होत असलेल्या ठाकरे गटाच्या या अभियानात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले, शिवसेनेला ठाणे शहराने यश दिले. सर्व राजकीय घडामोडींचे तुम्ही साक्षीदार आहात. देशात 18 तारखेला अघटीत अशी घटना घडली. ती म्हणजे शिवसेना मूळ पक्षाचे नाव आणि चिन्ह हे गद्दारांना मिळाले.या देशाच्या 75 वर्षाच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदा घडली. 1988 साली शिवसेनेला धनुष्यबाण मिळालं तेव्हापासून शिवसेना प्रमुखांनंतर उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाण देवाप्रमाणे पुजले आणि हेच धनुष्यबाण चोरांना दिले गेले यानंतर उध्दव ठाकरे यांना काय यातना आणि वेदना झाल्या असतील, असे म्हणत त्यांनी शिंदे गटासह एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. यावेळी पुढील भाषणात त्यांनी रामदास कदम आणि नारायण राणेंवर टीका करताना त्यांची मिमिक्रीही केली..बघा व्हिडीओ