भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार? नेमकं काय म्हणाले...?

भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार? नेमकं काय म्हणाले…?

| Updated on: Mar 10, 2024 | 3:32 PM

आमदार भास्कर जाधव यांनी रविवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत आक्रमक भाषण केले. नाराजी व्यक्त करताना भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचं जाहीरपणे म्हणत शब्द दिला,

चिपळूण, रत्नागिरी : 10 मार्च 2024 : शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी रविवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत आक्रमक भाषण केले. यानंतर भास्कर जाधव यांनीही उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत काही किस्से अन् भावना बोलून दाखवल्यात. भास्कर जाधव आपल्या भाषणातून म्हणाले, पक्षासाठी आपण सर्व काही केले, पण पक्षाने पदे देताना आपला विचार केला नाही. मी लढतो, ते उद्धव ठाकरे यांच्यासाठी. परंतु मला मंत्रीपद मिळाले नाही. गटनेतेपद मिळाले नाही. यापुढेही मिळणार नाही, हे माहीत आहे, अशी खंत भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली तर माझ्यावर अनेक आरोप करण्यात येत आहे. मंत्रीपद ,गटनेते पदासाठी माझा हक्क असतानाही माझ्या पदरात काहीच पडले नाही, अशी नाराजी व्यक्त करताना भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचं जाहीरपणे म्हणत शब्द दिला. तर मी कुठे ही जाणार नाही, विदर्भातील, मराठवाड्यातील लोक मला तुम्ही अखेरचा यौद्धा असल्याचे म्हणत यावेळी त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली.

Published on: Mar 10, 2024 03:32 PM