“त्यांना केक खाऊ घाला”, प्रश्न विचारण्यावरून फडणवीस आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये खडाजंगी

“त्यांना केक खाऊ घाला”, प्रश्न विचारण्यावरून फडणवीस आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये खडाजंगी

| Updated on: Jul 19, 2023 | 1:46 PM

आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस सुरु आहे. यावेळी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमने-सामने आल्याचे पाहयाला मिळालं.

मुंबई, 19 जुलै 2023 | आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस सुरु आहे. यावेळी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमने-सामने आल्याचे पाहयाला मिळालं.भास्कर जाधव म्हणाले की, “उपमुख्यमंत्री महोदय आपण माझ्या भावना समजू शकलात, आपल्यात जे वाक्चातुर्य आहे त्याला तोड नाहीये.पण गेल्या वर्षी एका वेळेला आठ-आठ लक्षवेधी लागायच्या. लक्षवेधींचा स्कोप आणि व्याख्या तुम्हाला माहिती आहेत. मी अध्यक्षांकडे जाऊन माझ्या दोन लक्षवेधी लावा विनंती केली. मी अनेकदा त्यांच्याकडे जातो, भेटून चहा पिऊन येतो. काही जरी चुकीचं झालं असेल तरी कानावर घालतो.मी राष्ट्रवादी अध्यक्ष असताना त्यांच्या प्रचाराला मीच गेलो होतो. पण खाजगीत तुम्ही काही सांगून ठेवलं आहे की काय, तुम्ही जर असं काही सांगून ठेवलं असेल तर मला सोबत घेऊन चला आणि हा विषय संपवून टाका.” यावर फडणवीसांनी काय उत्तर दिलं, यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…

 

Published on: Jul 19, 2023 01:46 PM