Bhaskar Jadhav : ‘खरंच एकत्र यायचंय की..’, ठाकरे बंधूंच्या युतीवर भास्कर जाधव स्पष्टच बोलले
Bhaskar Jadhav On Thackeray Brothers Unity : राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या हिताचं आहे, असं उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव यांनी म्हंटलं आहे. एकत्र यायचं की नाही, हा राज आणि उद्धव ठाकरेंचा विषय असल्याचं देखील यावेळी ते म्हणाले. राज ठाकरेंना खरच एकत्र यायचं आहे, की उद्धव ठाकरेंची कोंडी करायची आहे, हे अजून स्पष्ट व्हायचं आहे, असं वक्तव्य सुद्धा भास्कर जाधव यांनी केलं आहे.
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राज ठाकरेंनी एकत्र येण्याचं भाष्य केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्याला साद घातल्याने या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यावर आता राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
Published on: Apr 22, 2025 03:42 PM