भास्कर जाधवांना विचार करून नेतेपदाची जबाबदारी दिली- उद्धव ठाकरे
भास्कर जाधवांना विचार करून नेतेपदाची जबाबदारी दिली. आता लढण्याची वेळ आली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. भास्कर जाधव यांची नुकतीच शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली.
भास्कर जाधवांना विचार करून नेतेपदाची जबाबदारी दिली. आता लढण्याची वेळ आली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. भास्कर जाधव यांची नुकतीच शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं हे मोठं वक्तव्य आहे. “पक्षाचं काम निष्ठेनं केलं तरच उद्या चांगला दिवस उजाडणार आहे. अनेकांनी साथ सोडली म्हणून विचारावर आणि पक्षाच्या धोरणावर त्याचा परिणाम होणार नाही. अजूनही सर्वांसाठी दरवाजे हे खुले आहेत. ज्यांना राहायचं आहे ते राहतील आणि ज्यांना जायचं असेल त्यांच्यासाठी दरवाजे हे खुलाच आहे,” असंही ते म्हणाले.
Published on: Sep 06, 2022 05:39 PM