Raj Thackeray : राज ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा इशारा, भीम आर्मीचे अशोक कांबळे पोलिसांच्या ताब्यात
16 अटींचं राज ठाकरेंनी उल्लंघन केल्यास सभा उधळून लावण्याचा इशारा अशोक कांबळेंनी दिला होता. त्यामुळे पोलिसांनी अशोक कांबळे यांना ताब्यात घेतलं आहे.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज औरंगाबादेत जाहीर सभा होत आहे. संपूर्ण राज्यासह देशाचंही लक्ष या सभेकडे लागलं आहे. अशावेळी भीम आर्मीकडून (Bhim Army) ही सभा उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यासाठी भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबादकडे जाणार होते. भीम आर्मीचे महासचिव अशोक कांबळे (Ashok Kamble) आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईवरुन औरंगाबादच्या दिशेनं निघाले होते. त्यावेळी घाटकोपर पश्चिम चिराग नगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. भीम आर्मीचे पदाधिकारी राज ठाकरे यांना संविधानाची प्रत भेट देणार होते. राज ठाकरे संविधान मानत नाहीत. त्यामुळे त्यांनी संविधान भेट देणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. इतकंच नाही तर पोलिसांनी घालून दिलेल्या 16 अटींचं राज ठाकरेंनी उल्लंघन केल्यास सभा उधळून लावण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे पोलिसांनी अशोक कांबळे यांना ताब्यात घेतलं आहे.