राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काम करण्यासाठी आहेत की सतरंज्या उचलायला? कुणी केला खोचक सवाल?

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काम करण्यासाठी आहेत की सतरंज्या उचलायला? कुणी केला खोचक सवाल?

| Updated on: May 12, 2023 | 2:30 PM

VIDEO | बारामतीत लोकसभा निवडणूक लढणार ! शरद पवार यांची लेक सुप्रिया सुळे यांना कुणी केलं चॅलेंज?

पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई या भाजप प्रवेश करण्याच्या चर्चा सुरू होत्या. यासह ते बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढणार असल्याचे म्हटले जात होते. यावरच त्यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदारसंघात मी निवडणूक लढवणार आहे हे खरं आहे. कारण बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये लोकांना परिवर्तन हवं आहे. गेली पंधरा वर्ष तीच तीच व्यक्ती खासदार म्हणून निवडून येत आहेत आणि घराणेशाहीला आमचा विरोध असल्यामुळे या अगोदर इथे शरद पवार खासदार होते त्यानंतर अजित पवार खासदार होते. त्यानंतर सुप्रिया सुळे खासदार झाल्यानंतर आम्हाला आनंद झाला होता. कारण या मतदारसंघाला महिला खासदार मिळाले असून मात्र नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल अशी अशा असताना पुन्हा देखील सुप्रिया सुळे याच फिरताना दिसत आहेत. त्यामुळे कुठेतरी घराणेशाहीला विरोध केला पाहिजे आणि गेले अनेक वर्षे जे कार्यकर्ते काम करत आहेत त्यांना संधी दिली पाहिजे. कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलायला आहेत का? म्हणून पवारांची लेख आणि त्यांच्या विरोधात सर्वसामान्यांची लेक अशी लढाई करणे आता गरजेचं असल्याचे मत तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले आहे.

Published on: May 12, 2023 02:30 PM