Special Report | सांगलीत राडा! भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

| Updated on: Nov 08, 2021 | 10:14 PM

उमदेवार पळवापळीवच्या मुद्द्यावरुन रविवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर तसेच शिवसेना-राष्ट्रवादी गट आमनेसामने आले आहेत. दोन्ही गटात चांगलाच वाद झाला असून पडळकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आलीय. काही कार्यकर्ते जखमीदेखील झाले आहेत.

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वातावरण चांगलेच तापले आहे. उमदेवार पळवापळीवच्या मुद्द्यावरुन रविवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर तसेच शिवसेना-राष्ट्रवादी गट आमनेसामने आले आहेत. दोन्ही गटात चांगलाच वाद झाला असून पडळकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आलीय. काही कार्यकर्ते जखमीदेखील झाले आहेत. या महाविकास आघाडी विरोधात मी आवाज उठवत आहे. त्यामुळे मला संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काल आटपाडी मध्ये हल्ला करण्यात आला. पण माझ्या पाठीमागे देवाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने लोक मला मारण्यासाठी आले होते. हे राजकीय षड्यंत्र आहे. येत्या 10 तारखेला एसटीचे आंदोलन आहे. त्यासाठी मी तेथे जाऊ नये. यासाठी कुठे ना कुठे मला अडकवून ठेवायचे आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.