बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण मास्टरमाईंडचा आरोप होणारा वाल्मिक कराडच सुटला!

बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण मास्टरमाईंडचा आरोप होणारा वाल्मिक कराडच सुटला!

| Updated on: Jan 12, 2025 | 10:29 AM

संतोष देशमुख हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोका लावण्यात आला आहे. मात्र या आठ जणांच्या यादीत मास्टरमाईंड असल्याचा आरोप करण्यात येत असलेल्या वाल्मिक कराडची यातून सुटका झाली आहे.

बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. हत्या आणि खंडणी प्रकरण एकच असून आरोपींवर मकोका लावण्याची मागणी करण्यात येत होती. या प्रकरणात 8 जणांवर मकोका लावण्यात आला आहे. मात्र या आठ जणांच्या यादीत मास्टरमाईंड असल्याचा आरोप करण्यात येत असलेल्या वाल्मिक कराडची यातून सुटका झाली आहे. त्यावरून विरोधक आक्रमक झालेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे, सिद्धार्थ सोनवणे आणि महेश केदार यांच्यावर मकोका लावण्यात आलाय. यापैकी कृष्णा आंधळे अद्याप फरार असून तो पोलिसांच्या हाती लागला नाही. महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाईज्ड क्राईम अॅक्ट म्हणजेच संघटित गुन्हेगारीवर वचक आणण्यासाठी १९९९ मध्ये हा कायदा आणण्यात आला. अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडण्यासाठी सरकारने हा कायदा आणला होता. तर संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हा कायदा असल्याने लवकर जामीन मिळत नाही. त्यामुळे या प्रकरणातील 8 जणांवर मकोका लावण्याने पोलिसांना तपसासाठी ६ महिने मिळणार तर आरोपपत्र दाखल करण्यासाठी ६ महिने मिळणार आहे.

Published on: Jan 12, 2025 10:29 AM