Special Report | NCB च्या समीर वानखेडेंवर मोठी कारवाई!
आर्यन खान केससह सहा केसेस वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आल्या आहेत. या सर्व केकेसचा तपास एनसीबीची दिल्ली टीम करणार आहे. तशी माहिती एनसीबीचे वरीष्ठ अधिकारी मुथा अशोक जैन (Mutha Ashok Jain) यांनी दिलीय.
मुंबई : क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खान केसचा तपास एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. आर्यन खान केससह सहा केसेस वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आल्या आहेत. या सर्व केकेसचा तपास एनसीबीची दिल्ली टीम करणार आहे. तशी माहिती एनसीबीचे वरीष्ठ अधिकारी मुथा अशोक जैन (Mutha Ashok Jain) यांनी दिलीय. दरम्यान, आर्यन खान प्रकरणाची चौकशी आता संजय सिंग यांच्याकडे देण्यात आली आहे. उद्यापासूनच संजय सिंग या प्रकरणाची तपास करणार येणार असल्याचं सूत्रांनी सांगितले.
Latest Videos