VIDEO : Kishori Pednekar | मुंबईत ‘एक दिवसाआड’ शाळा भरणार, एका बेंचवर एक विद्यार्थी बसणार : किशोरी पेडणेकर
मुंबईतल्या शाळा 4 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग 4 ऑक्टोबरपासून सुरु होतील. राज्य सरकारनं दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करुन मुंबईतल्या शाळा सुरु होणार आहेत. नियमावलीनुसार एकदिवसाआड शाळा भरतील. एका बेंचवर एकाच विद्यार्थ्याला बसायला परवानगी असणार आहे.
मुंबईतल्या शाळा 4 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग 4 ऑक्टोबरपासून सुरु होतील. राज्य सरकारनं दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करुन मुंबईतल्या शाळा सुरु होणार आहेत. नियमावलीनुसार एकदिवसाआड शाळा भरतील. एका बेंचवर एकाच विद्यार्थ्याला बसायला परवानगी असणार आहे. तसंच विद्यार्थ्याला शाळेत यायला पालकांची परवानगी असणार आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. कोरोना जूनही संपला नाही. सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी. आता आपणही काळजी घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईतील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरु होत आहेत.
Latest Videos