Abhijeet Bichukale यांना राज ठाकरे यांच्याबद्दल कोणती गोष्ट खुपते? Watch Video

Abhijeet Bichukale यांना राज ठाकरे यांच्याबद्दल कोणती गोष्ट खुपते? Watch Video

| Updated on: Sep 07, 2023 | 4:02 PM

VIDEO | 'खुपते तिथे गुप्ते' या शोच्या नव्या भागात बिगबॉस मराठी फेम अभिजीत बिचुकले यांच्या सहभाग? बिचुकले यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नेमकं काय खुपतं? बघा व्हिडीओ थेट म्हणाले...

मुंबई, ७ सप्टेंबर २०२३ | प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते सूत्रसंचालन करत असलेल्या मराठी शो खुपते तिथे गुप्ते सध्या चर्चेत आहे. यामध्ये अनेक राजकीय नेते सहभागी होतात. आपल्या अनोख्या शैलीने अवधुत गुप्ते नेते मंडळींना या मंचावर बोलतं करत असतात. या शोच्या तिसऱ्या पर्वालाही पसंती मिळत असून या शोच्या नव्या भागात बिगबॉस मराठी फेम अभिजीत बिचुकले सहभागी होणार आहेत. याचा प्रोमो झी मराठीच्या ऑफिशिअल सोशल मिडियापेजवरून शेअर करण्यात आलाय. या प्रोमोत अवधूत गुप्ते अभिजीत बिचुकले यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल प्रश्न बिचारताना पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांच्याबद्दल कोणती गोष्ट खुपते असे अवधुत गुप्ते विचारतो. त्यावर बिचुकले त्यांच्या स्टाईलं उत्तर देताना बघायला मिळत आहे. बघा व्हिडीओ

Published on: Sep 07, 2023 04:01 PM