BIG Breaking : कलेक्टरिन बाईंना मोठा धक्का, UPSC कडून पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द, यापुढे…
यूपीएससीने पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आहे. यामुळे पूजा खेडकर यांना यापुढे यूपीएससीची परीक्षा देता येणार नाही. इतकंच नाहीतर यूपीएससीने पूजा खेडकर यांना भविष्यात सर्व परीक्षा आणि निवडीमधून काढले आहे. पूजा खेडकर यांनी यूपीएससीच्या नियमांचे उल्लंघन केले होते.
पुण्यातील वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसला आहे. यूपीएससीकडून वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यूपीएससीने पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आहे. यामुळे पूजा खेडकर यांना यापुढे यूपीएससीची परीक्षा देता येणार नाही. इतकंच नाहीतर यूपीएससीने पूजा खेडकर यांना भविष्यात सर्व परीक्षा आणि निवडीमधून काढले आहे. पूजा खेडकर यांनी यूपीएससीच्या नियमांचे उल्लंघन केले होते. यामध्ये पूजा खेडकर दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर ही कडक कारवाई करण्यात आली आहे. नागरी सेवा परीक्षा नियम २०२२ नुसार पूजा खेडकर दोषी आढळले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर यूपीएससीकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पूजा खेडकर यांच्या बाजूने आज कोर्टात युक्तिवाद करण्यात आला होता की, अजून यूपीएससीने दोषी ठरवलेले नाही. यूपीएससीकडून आज दुपारपर्यंत तिचं म्हणणं मांडायला वेळ देण्यात आला होता. अखेर यूपीएससीने पूजा खेडकर यांच्यावर कडक कारवाई केली आहे.