महामार्ग पूर्ण होण्याआधीच रस्त्याला पडल्या तडा, प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर

महामार्ग पूर्ण होण्याआधीच रस्त्याला पडल्या तडा, प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर

| Updated on: May 04, 2023 | 11:16 AM

VIDEO | गेल्या चार वर्षांपासून काम सुरू अन् रस्ता पूर्ण होण्याआधीच पडल्या भेगा, कोणत्या महामार्गची भीषण स्थिती?

परभणी : कोणताही महामार्ग म्हटला तर त्या रस्त्यावरून वाहनांची मोठी वर्दळ पाहायला मिळते. मोठ्या दोन शहरांना जोडणारा रस्ता हा महामार्ग असतो. मात्र नव्याने तयार होणाऱ्या परभणी जिंतूर महामार्गाबद्दल एक भीषण वास्तव समोर आले आहे. परभणी जिंतूर महामार्ग तयार होण्यापूर्वीच रस्त्यावर मोठ्या तडा पडल्याचे बघायला मिळत आहे. मागील चार वर्षापासून परभणी जिंतूर महामार्ग या रस्त्याचे काम संत गतीने सुरू आहे. मात्र अद्यापही या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही, मात्र परभणी जिंतूर हा महामार्ग पूर्ण होण्याआधीच रस्त्याला तडा पडल्याचे समोर आल्याने प्रशासनाचा गलथान कारभार समोर आला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यामध्ये भेगा पडल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय अपघात वाढण्याची शक्यता वाढली आहे.

Published on: May 04, 2023 11:16 AM