दिल्लीतून भाजपच्या कोअर कमिटीत मोठा निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला काय सूचना?
दिल्लीतून भाजपच्या कोअर कमिटीत मोठा निर्णय देखील घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. कोणत्याही एका नेतृत्त्वात भाजप अवलंबून राहणार नाही, असं सूत्रांनी दिलेल्या माहितीतून समोर येत आहे. तर एक नेतृत्व म्हणजे नेमकं कोण? असा सवाल उपस्थित केला जातोय आणि सध्या त्याचीच चर्चा होतेय.
महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्त्वाचं विकेंद्रीकरण होणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. तर दिल्लीतून भाजपच्या कोअर कमिटीत मोठा निर्णय देखील घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. कोणत्याही एका नेतृत्त्वात भाजप अवलंबून राहणार नाही, असं सूत्रांनी दिलेल्या माहितीतून समोर येत आहे. तर एक नेतृत्व म्हणजे नेमकं कोण? दिल्लीतल्या हायकमांडचं नेमकं कोणाकडे बोट? असा सवाल उपस्थित केला जात असून याची चर्चा सुरू आहे. केंद्रीय नेतृत्व राज्यातील घडामोडींवर लक्ष ठेवणार असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, दिल्लीतल्या हायकमांडने महाराष्ट्र भाजपला काही सूचना दिल्यात आहे. महाराष्ट्रात एकट्याच्या मर्जीने निर्णय होणार नाही, निर्णय सामूहिक निर्णय व्हावेत. कोअर कमिटीला सोबत घेऊनच निर्णय घ्यावा आणि पक्ष चालवावा, असे आदेश देण्यात आलेत. बघा व्हिडीओ आणखी कोणत्या सूचना आहेत…