Vande Bharat Express : वंदेभारत एक्सप्रेसची सुसाट सफाई, अवघ्या १४ मिनिटांत पूर्ण ट्रेन होणार एकदम चकाचक
VIDEO | वंदेभारत एक्सप्रेसच्या स्वच्छतेसंदर्भात रेल्वे प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय. भारताची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन वंदेभारत एक्सप्रेसची संपूर्ण स्वच्छता आता अवघ्या 14 मिनिटांत होणार आहे. वंदेभारतची स्वच्छता करण्यासाठी चार तास लागायचे मात्र आता अवघे 14 मिनिट पुरेसे ठरणार आहेत.
नवी दिल्ली, १ ऑक्टोबर २०२३ | वंदेभारत एक्सप्रेसच्या स्वच्छतेसंदर्भात रेल्वे प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे. भारताची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन वंदेभारत एक्सप्रेसची संपूर्ण स्वच्छता आता अवघ्या 14 मिनिटांत होणार आहे. आज दिल्ली रेल्वे स्थानकावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या सुविधेचे उद्घाटन केले असून देशभरात एकाच वेळी वंदेभारत एक्सप्रेस स्वच्छतेच्या या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. जपानच्या प्रसिद्ध अन् नावाजलेल्या बुलेट ट्रेनच्या स्वच्छतेच्या संकल्पनेवर आधारीत वंदेभारत एक्सप्रेस स्वच्छ करण्याची योजना आखत रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे आणि भारतीय रेल्वेने स्वच्छता ही सेवा या नावाने मोहिम सुरु केली आहे. यापूर्वी वंदेभारत एक्सप्रेसची स्वच्छता करण्यासाठी चार तास लागायचे. आता केवळ एका ट्रेनच्या स्वच्छतेसाठी अवघे 14 मिनिट पुरेसे ठरणार आहेत. वंदेभारतच्या प्रत्येक कोचसाठी चार सफाई कर्मचाऱ्यांची टीम नियुक्त केली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.