विधानसभेसाठी ‘या’ दिग्गजांनी भरले अर्ज, कुठे होणार तडगी फाईट अन् कोणी केला विजयाचा दावा?
गुरूपुष्यामृत योग साधत राजकीय वर्तुळातील सर्वच दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरले. जोरदार शक्तिप्रदर्शन करत राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आदित्य ठाकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जयंत पाटील आणि चंद्रकांत दादा पाटील यांनीही अर्ज दाखल केलाय.
गुरूपुष्यामृत योग साधत दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरले. महायुती आणि महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांनी २४ तारखेचा मुहूर्त साधला. ठाकरेंच्या शिवसेनेने दुसऱ्यांदा आदित्य ठाकरे यांना वरळीतून तिकीट दिलं. अर्ज दाखल करताना आदित्य ठाकरेंसोबत स्वतः उद्धव ठाकरे, आई रशमी ठाकरे आणि भाऊ तेजस ठाकरे उपस्थित होते. अर्ज भरण्यापूर्वी आदित्य ठाकरेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. ओपन गाडीतून त्यांची रॅली निघाली. कोळी महिलांनी या रॅलीत लक्षवेधी नृत्यू केल्याचे पाहायला मिळाले. वरळीमध्ये महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही तर मनसेकडून संदीप देशपांडे रिंगणात आहेत. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील या दिग्गज मंत्र्यांनी अर्ज भरले. दादांचे मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यातून आपला अर्ज भरला. अर्ज भरण्यापूर्वी भुजबळांचा रोड शो झाला. धनंजय मुंडे यांनी रॅली वैगरे न काढताच साध्या पद्धतीने अर्ज भरला. यापूर्वी धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांच्या घरी गेलेत, यावेळी त्यांच्याकडून औक्षण करून घेतलं. इतकंच नाहीतर अर्ज भरताना त्यांच्या दोघी बहिणी सोबत होत्या. तर आंबेगाव येथून अर्ज भरताना मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला. बघा स्पेशल रिपोर्ट…