Ketaki Chitale : मोठी बातमी! केतकीच्या जामीनावर आज किंवा उद्या सुनावणी
केतकीने जामीन अर्ज दाखल केला होता. यावर आज किंवा उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेती केतकी चितळेवर (Ketaki Chitale) अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केतकीची तीन दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर तिला ठाणे सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली. यावेळी केतकीने जामीन अर्ज दाखल केला होता. यावर आज किंवा उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.
Published on: May 19, 2022 10:57 AM
Latest Videos