मोठी बातमी : प्राचार्यांना मारहाण, आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल
आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक उपाध्याय यांना मारहाण केली होती. प्राचार्य यांचा कानही पिरगळला होता.
हिंगोली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( cm eknath shinde ) यांच्या उठावात सामील झालेले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर ( santosh bangar ) यांच्याविरोधात प्राचार्य ( principal ) मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यासोबत ३० ते ४० कार्यकर्ते आणि महाविद्यालयातील ५ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक उपाध्याय यांना मारहाण केली होती. प्राचार्य यांचा कानही पिरगळला होता. त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर चांगलाच व्हायरल झाला होता. अखेर याप्रकरणी पोलिसांनी आमदार बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Published on: Jan 28, 2023 09:21 AM
Latest Videos