मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, मुख्यमंत्र्यांनी काय घेतला निर्णय?
२०२४-२५ मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून ६ महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आता जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ६ महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज दाखल केल्यापासून ६ महिन्याचा वेळ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांच्याकडे विद्यार्थ्यांनी तशी तक्रार केली होती. मात्र यासाठी आता ६ महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्याच्या निर्णयानुसार, २०२४-२५ मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून ६ महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणीही दूर होतील. कारण, जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ६ महिन्यांचा अवधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.