लाडकी बहीण योजनेबाबत सरकारला मोठा दिलासा; विरोधातील याचिकेवर हायकोर्टाचा निर्णय
लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलेल्या याचिकेत असे म्हटले होते की, लाडकी बहीण योजना करदात्यांच्या पैशाचा अपव्यय आहे. या योजनेवर बराच पैसा खर्च होणार असल्याने या योजनेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.
लाडकी बहीण योजना हा सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. इतकंच नाहीतर लाडकी बहीण योजनेत कोणताही हस्तक्षेप करता येणार नाही, असं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलं आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेविरोधात दाखल करण्यात आली होती. नवी मुंबईतील सीएने लाडकी बहीण.योजनेविरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. त्यामुळे राज्य सरकारला हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलेल्या याचिकेत असे म्हटले होते की, लाडकी बहीण योजना करदात्यांच्या पैशाचा अपव्यय आहे. या योजनेवर बराच पैसा खर्च होणार असल्याने या योजनेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. तर लाडकी बहीण योजना ही करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याने तिजोरीवर आर्थिक भार येत असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला होता.