सिद्दिकी पितापुत्रांना एकत्रच मारण्याचा होता प्लॅन, आरोपींनी काय दिली चौकशीत कबुली?
बाबा सिद्दीकींच्या आरोपींच्या चौकशीतून मोठा आणि धक्कादायक खुलासा समोर आलाय. आरोपींना बाबा सिद्दीकी यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी यांना देखील मारण्याचे आदेश बिश्नोई गँगकडून होते.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास जस जसा पुढे जातोय तस-तसे मोठे खुलासे समोर येत आहेत. आरोपींच्या चौकशीतून आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. बाबा सिद्दीकी यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी यांना देखील मारण्याचा डाव होता, असंही आरोपींनी सांगितले आहे. आरोपी धर्मराज कश्यप आणि गुरूनैल सिंगनं चौकशीत सांगितलंय की, सिद्दीकी पितापुत्रांना एकाचवेळी मारण्याचे आदेश बिश्नोई गँगकडून देण्यात आले होते. शनिवारी रात्री ९ वाजून २० मिनिटांच्या दरम्यान, आमदार मुलगा झिशानच्या कार्यालयातून बााब सिद्दीकी बाहेर पडले. झिशान सिद्दीकीही बडील बाबा सिद्दीकींसोबत कार्यालयातून निघाले पण त्यावेळी त्यांना एक फोन आला आणि ते परत कार्यालयात गेले. मात्र बाबा सिद्दीकी कार्यालयाच्या बाहेर पडून काही मिटर अंतरावर कारची वाट पाहत होते. त्याचवेळी हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्या ज्यात त्यांचा मृत्यू झाला. बघा स्पेशल रिपोर्ट कोणते आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि कोणत्या आरोपीच्या शोधात पोलीस आहेत?