VIDEO : Mumbai | ‘माझ्या बायकोने ते चुकून केलं असावं’, समीर वानखेडेंच्या वडिलांचा मोठा खुलासा
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी माझ्या मुलाचं जात प्रमाणपत्र मुस्लीम जातीचं नसल्याचं म्हटलं आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना विविध कागदपत्रे दाखवली. ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत.
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी माझ्या मुलाचं जात प्रमाणपत्र मुस्लीम जातीचं नसल्याचं म्हटलं आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना विविध कागदपत्रे दाखवली. ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. गेल्या दहा पंधरा दिवसांपासून माझ्या मुलाला बदनाम करण्याची मालिका सुरु झालेली आहे. नवाब मलिकांना नक्की काय म्हणायचं आहे. त्यांच्या मनात काय हे समजत नाही. जातीचं प्रमाणपत्र, लग्नाचं प्रमाणपत्र सादर केलेलं आहे. नवाब मलिक मंत्री असून आकसापोटी किंवा जावयांना अटक केल्यामुळं असं करतायत का?, असं ज्ञानदेव वानखेडे म्हणाले.
Latest Videos