VIDEO : Jitendra Awhad Live | मी बेसावध कधीच नसतो, बोलतो ते मनापासून : जितेंद्र आव्हाड

VIDEO : Jitendra Awhad Live | मी बेसावध कधीच नसतो, बोलतो ते मनापासून : जितेंद्र आव्हाड

| Updated on: Jan 05, 2022 | 2:27 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या एका वक्तव्यानं आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. ठाण्यात ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने ठाण्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला होता. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या एका वक्तव्यानं आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. ठाण्यात ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने ठाण्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला होता. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. त्यावेळी आरक्षणावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबाबत (OBC Community) एक वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत भाजप नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आव्हाडांनी माफी मागावी अशी मागणी केलीय. त्यानंतर आता आव्हाडांच्या घराजवळ भाजपने आंदोलन केले आहे.