VIDEO : Devendra Fadnavis महाराष्ट्राचे नेते; त्यांना नागपूरपुरतं मर्यादीत का ठेवता-Sanjay Raut यांचा टोला
खासदार संजय राऊत हे नागपुरमध्ये आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पक्षाच्या संपर्कासाठी मराठवाडा, विदर्भात आल्याचे सांगितलं. यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नेते, त्यांना नागपूरपुरतं मर्यादीत का ठेवता म्हणत राऊतांनी टोला मारला.
खासदार संजय राऊत हे नागपुरमध्ये आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पक्षाच्या संपर्कासाठी मराठवाडा, विदर्भात आल्याचे सांगितलं. यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नेते, त्यांना नागपूरपुरतं मर्यादीत का ठेवता म्हणत राऊतांनी टोला मारला. ईडीच्या कारवायांबद्दल राऊत म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणा खुळखुळा झालाय. मध्यमवर्गीय व्यक्तीवर आक्षेप घेण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक कारवाया होतात. अभिषेक बॅनर्जी यांना इडीनं दिल्लीत बोलावलं. मी झुकणार नाही, असं बॅनर्जी म्हणाले. हा राजकीय गैरवापर होतो. भाजपचं राज्य नसणाऱ्या ठिकाणीचं ईडीची कारवाई होते. सात वर्षात तेवीस हजार धाडी पडल्या. महाराष्ट्र, बंगालमध्ये सत्ता पाडू, असं भाजपचं स्वप्न आहे.
Latest Videos