VIDEO : माझ्या मुलीची बदनामी करू नका, Disha Salian च्या आईने व्यक्त केली हळहळ
अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यू प्रकरणावरून सुरू झालेले राजकारण काही केल्या थांबायला तयार नाही. दोघांच्या मृत्यूला दीड वर्षाहून अधिक काळ लोटला. मात्र, अजूनही आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे.
अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यू प्रकरणावरून सुरू झालेले राजकारण काही केल्या थांबायला तयार नाही. दोघांच्या मृत्यूला दीड वर्षाहून अधिक काळ लोटला. मात्र, अजूनही आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. त्यातच आज भाजप आमदार नितेश राणे यांनी सकाळ-सकाळी एकामागून एक चार ट्वीट्स करत दिशा सालियान आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात कनेक्शन असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली. या साऱ्या प्रकाराला दिशाचे कुटुंबीय कंटाळले असून, तिच्या आईने तर आम्हाली जगावं वाटत नाही. आम्ही काही केलं, तर हे लोक जबाबदार असतील. त्यामुळे कृपा करून हे घाणेरडे राजकारण थांबवा, अशी अर्त विनवणी केलीय.
Latest Videos