Ajit Pawar : पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार की नाही? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आपण शरद पवार यांच्याशी संपर्कात नसल्याचे अजित पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. राजकारणामुळे पवार कुटुंबात निर्माण झालेली कटुता दूर होईल, असे मला वाटत नसल्याचे म्हणत अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं.
अजित पवार यांनी आगामी काळात शरद पवार यांच्याशी पुन्हा जुळवून घेणे अशक्य असल्याचे संकेत दिले आहेत. ‘राजकारणामुळे पवार कुटुंबात निर्माण झालेली कटुता भविष्यात दूर होईल असं वाटत नाही.’, असं वक्तव्य अजित पवार यांनी नुकत्याचे एका मुलाखतीत म्हटलं आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार हे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना सध्यातरी पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांच्या संपर्कात नसल्याचे म्हणत शरद पवारांशी बोलणं होत नाही, सुप्रिया सुळे यांच्याशी एक-दोन वेळा फोनवर संपर्क झाला. तर माझा भाऊ माझ्यावर फार आहे. तो टोकाचं बोलायला लागला, कशामुळे त्याला असे वाटायला लागले, त्याचा स्वभाव असा का झाला, कळायला मार्ग नाही, असं म्हणत श्रीनिवास पवार यांच्यासंदर्भात बोलताना अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार पुढे असेही म्हणाले, ‘भाजपसोबत सत्तेत जाण्यासंदर्भात शरद पवारांना पत्र दिलं होतं. शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील आणि मला भाजपसोबत चर्चा करण्यास सांगितलं होतं. शरद पवार भाजपसोबत चर्चा करण्यासाठी नव्हतेच.’, भाजप आणि एकनाथ शिंदेंसोबत सत्ता स्थापन करण्यासंदर्भातील प्रश्नावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.