VIDEO : Ajit Pawar | कोकणी माणूस विचारपूर्वक मतदान करतो हा इतिहास : अजित पवार
कोकणी माणूस फार विचारपूर्वक मतदान करतो, हा इतिहास आहे. त्यामुळे कुणाच्याही दहशतीला, दबावाला बळी पडू नका. अत्यंत विचारपूर्वक मतदान करा. आरोप-प्रत्यारोप करण्यात मला स्वारस्य नाही. आणि मला कसलाही फायदा उठवायचा नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग येथे डीपीडीसी बैठकीसाठी आणि कोरोनाचा आढावा घेण्यासाठी गेले असता ते बोलत होते.
कोकणी माणूस फार विचारपूर्वक मतदान करतो, हा इतिहास आहे. त्यामुळे कुणाच्याही दहशतीला, दबावाला बळी पडू नका. अत्यंत विचारपूर्वक मतदान करा. आरोप-प्रत्यारोप करण्यात मला स्वारस्य नाही. आणि मला कसलाही फायदा उठवायचा नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग येथे डीपीडीसी बैठकीसाठी आणि कोरोनाचा आढावा घेण्यासाठी गेले असता ते बोलत होते. अजित पवार म्हणाले की, बँक ही त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची आर्थिक नाडी म्हणून ओळखली जाते. खरे तर इथे पीक कर्ज इथे कमी दिलं जातं. मात्र, आमच्याकडं हजारो कोटी दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार म्हणाले की, पूर्वी सतीश सावंत यांच्या मागे असणारी मंडळी काय काय काम सांगायची. तसं नसतं, बँक ही बँक असते, असे म्हणत त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोला हाणला.
Latest Videos