VIDEO : Devendra Fadnavis | रझा अकादमी कोणाचं पिल्लू हे सगळ्यांना माहिती : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावतीतील हिंसेचाराचा आढावा घेतला. त्यानंतर या हिंसाचारात नुकसान झालेल्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. 13 तारखेची घटना ही 12 तारखेच्या घटनेची रिअॅक्शन होती.
देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावतीतील हिंसेचाराचा आढावा घेतला. त्यानंतर या हिंसाचारात नुकसान झालेल्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. 13 तारखेची घटना ही 12 तारखेच्या घटनेची रिअॅक्शन होती. पण कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही. 12 तारखेची घटना डिलीट करून 13 तारखेच्या घटनेवर बोलत आहेत. सर्व कारवाई 13च्या घटनेवर सुरू आहे. 12च्या घटनेवर काहीच कारवाई नाही. तसेच फडणवीस म्हणाले की, रझा अकादमी कोणाचं पिल्लू हे सगळ्यांना माहिती आहे. 12 तारखेची घटना डिलीट करून 13 तारखेच्या घटनेला जे जबाबदार नाही, पण ते हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत. म्हणून टार्गेट केलं जातं आहे. याद्या करून टार्गेट केलं जात आहे हा आमचा आरोप आहे.
Latest Videos