VIDEO : Sanjay raut | ज्याचा मुख्यमंत्री त्याचंच सरकार, शिवसेना खासदार संजय राऊतांचं विधान

VIDEO : Sanjay raut | ज्याचा मुख्यमंत्री त्याचंच सरकार, शिवसेना खासदार संजय राऊतांचं विधान

| Updated on: Sep 04, 2021 | 1:47 PM

 शिवसेना नेते खासदार संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघातल्या विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावत आहेत. खेड-शिरुरच्या सेना कार्यकर्त्यानी त्यांचं सकाळी जोरदार स्वागत केलं. यावेळी संजय राऊत म्हणाले की, राज्यात जरी तीन पक्षाचे सरकार असलं तरी मुख्यमंत्री ज्यांचा असतो त्यांच सरकार असतं.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघातल्या विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावत आहेत. खेड-शिरुरच्या सेना कार्यकर्त्यानी त्यांचं सकाळी जोरदार स्वागत केलं. यावेळी संजय राऊत म्हणाले की, राज्यात जरी तीन पक्षाचे सरकार असलं तरी मुख्यमंत्री ज्यांचा असतो त्यांच सरकार असतं. सरकार आपलं आहे, अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादीच्या गडात जाऊन आपली ‘पॉवर’ दाखवली.  शिरुर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळचा शिवसेनेचा गड… आढळराव पाटील यांनी तिथूनच खासदारकीची हॅट्रिक केली. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चौकार मारण्यापासून त्यांना राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी रोखलं.