व्यावसायिक कामानिमित्त गेलेल्या नागपुरातील भाजपच्या कार्यकर्त्या सना खान प्रकरणात मोठी अपडेट

व्यावसायिक कामानिमित्त गेलेल्या नागपुरातील भाजपच्या कार्यकर्त्या सना खान प्रकरणात मोठी अपडेट

| Updated on: Aug 11, 2023 | 9:25 PM

VIDEO | मध्यप्रदेशातील जबलपूर येथे व्यावसायिक कामानिमित्त गेलेल्या नागपुरातील भाजपच्या कार्यकर्त्या सना खान प्रकरणात मोठी अपडेट, भाजपच्या कार्यकर्त्या सना खान यांचा पती अमित साहूला अटक, काय आहे कारण?

नागपूर, ११ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील भाजपच्या कार्यकर्त्या सना खान बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर सना खान यांच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. कारण सना खान या मध्यप्रदेशातील जबलपूरमधून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्यात भाजपच्या कार्यकर्त्या सना खान बेपत्ता झाल्या असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. सना खान या मध्यप्रदेशातील जबलपूर येथे व्यावसायिक कामासाठी गेल्या होत्या, या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सना खानची हत्या केल्याची कबुली पती अमित साहू उर्फ पप्पू यांनी पोलिसांना दिली. नागपूर पोलिसांनी काल अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा केल्यानंतर नागपूर पोलिसांची टीम जबलपूरला पोहचली. त्यानंतर काही तासात अमित साहूला अटक करत अन्य दोन जणांना ताब्यात घेतल आहे.

Published on: Aug 11, 2023 09:20 PM