डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा ११ वर्षांनंतर निकाल, तिघे निर्दोष तर किती आरोपींना जन्मठेप?

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा ११ वर्षांनंतर निकाल, तिघे निर्दोष तर किती आरोपींना जन्मठेप?

| Updated on: May 10, 2024 | 11:49 AM

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा अखेर निकाल आज लागला आहे. पुणे सत्र न्यायालकडून या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तर या प्रकरणातील पाच आरोपी पैकी दोन आरोपी दोषी तर तीन जणांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा अखेर निकाल आज लागला आहे. पुणे सत्र न्यायालकडून या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात विरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. विरेंद्र तावडे यांच्या कटकारस्थान रचल्याचा आरोप होता. तर या प्रकरणातील पाच आरोपी पैकी दोन आरोपी दोषी तर तीन जणांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला दोषी ठरवून जन्मठेप शिक्षा पुणे सत्र न्यायालयाकडून देण्यात आली आहे. यासह त्यांना पाच लाखांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सकाळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर महाराष्ट्रासह देशातही खळबळ उडाली होती.

Published on: May 10, 2024 11:43 AM