Salman Khan बॉलिवूडमध्ये उन्माद माजवतोय, Abhijit Bichukal चा आरोप | Bigg Boss 15
बिग बॉस शोमध्ये सलमान खानची जीभ घसरली होती, ते जे वक्तव्य आहे ते आम्ही दाखवणार नसल्याचं आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं, मात्र मी शोमधून बाहेर पडल्यानंतर ते वक्तव्य पाहिलं आणि माझी तिखट प्रतिक्रिया दिली ती सलमान ने लक्षात घ्यावी. असा सज्जड दमही बिचुकलेंनी सलमानला भरला आहे.
पुणे : अभिजीत बिचुकले (Ahijeet Bichukle) हे नाव बिग बॉसमुळे (Big boss) साऱ्या देशाला माहिती झालं आहे. पण जसे बिचुकले बिगबॉसच्या घरातून बाहेर पडले आहेत तेव्हापासून ते सलमान खानवर (Salman Khan) आग ओकत आहेत. सध्या सलमान खान बिचुकलेंच्या टार्गेटवर आहे. आता तर बिचुकलेंनी सलमानला कोथळा काढू असाच इशारा देऊन टाकलाय. बिग बॉस शोमध्ये सलमान खानची जीभ घसरली होती, ते जे वक्तव्य आहे ते आम्ही दाखवणार नसल्याचं आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं, मात्र मी शोमधून बाहेर पडल्यानंतर ते वक्तव्य पाहिलं आणि माझी तिखट प्रतिक्रिया दिली ती सलमान ने लक्षात घ्यावी. असा सज्जड दमही बिचुकलेंनी सलमानला भरला आहे. सलमान खानला टक्कर देण्या एवढा तो ग्रेट नाही, बॉलीवूड सलमान खानच्या बापाची आहे का? बॉलिवूड मध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत. असेही बिचुकले म्हणाले आहेत.
Latest Videos