विधानसभेला 288 जागा लढवणार, अभिजीत बिचुकले यांची मोठी घोषणा; नेमकं काय म्हणाले?
VIDEO | दहावीपर्यंतचे शिक्षण मुलींना मोफत करा, अभिजीत बिचुकले यांची कुणाकडं मागणी?
सातारा : विधानसभा निवडणुकीला 288 जागा लढवणार असल्याची मोठी घोषणा बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी केली तर शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मुलींचे दहावीपर्यंतचे शिक्षण मोफत करा, अशी मागणीही अभिजीत बिचुले यांनी केल्याचे समोर आले आहे. नेहमीच आपल्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले कवी मनाचे नेते म्हणून ओळखले जाणारे साताऱ्याचे अभिजीत बिचुकले यांनी विधानसभेला 288 जागा लढणार असल्याचे आज जाहीर केले आहे. त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या अनुषंगाने राज्य शासनाने बालवाडी ते इयत्ता 10 वी पर्यंतचे शिक्षण सर्व मुलींना सर्व शाळांमध्ये मोफत द्यावे, अशी मागणी देखील बिचुकले यांनी केली आहे. यासंदर्भातील पत्र देखील बिचुकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांवर देखील हल्लाबोल केला आहे. गरज पडल्यास छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव वापरता, असेही ते म्हणाले.