Ayodhya Ram Mandir : मोदीजी तुमची एक गोष्ट खटकली… बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले असं का म्हणाले?
अयोध्येत उद्या प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येसह देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यावर भाष्य केले आहे
मुंबई, २१ जानेवारी, २०२४ : अयोध्येत उद्या प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या भव्य दिव्य अशा ऐतिहासिक सोहळ्याला अवघे काही तासच शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येसह देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यावर भाष्य केले आहे. येत्या २२ जानेवारी रोजी होणारा अयोध्येतील प्रभू श्री रामाचा सोहळा हा राम नवमीच्या दिवशी का घेतला नाही? असा सवालच अभिजीत बिचुकले यांनी केलाय. तर अयोध्येतील या कार्यक्रमाला राजकीय रंग असल्याचे म्हणत प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येत होतंय ही आनंदाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी मोठा फॅन आहे. मात्र त्यांचा एक खटकण्याजोगी गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर प्रभू रामचंद्राच्या बोटाला धरून नरेंद्र मोदी श्रीरामाला मंदिरात घेऊन जात आहेत. यामध्ये तुम्ही प्रभू रामचंद्राचे बाप आहात असं तुम्हाला सुचवायचं होतं का, असे म्हणत अभिजीत बिचुकले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.