Bigg Boss Fame Suraj Chavan : सूरज चव्हाण यानं घेतली अजित पवार यांची भेट, भेटीनंतर एकच म्हणाला, ‘दादा तर…’
सूरज चव्हाण हा मूळचा बारामतीचा असलेल्या त्याने बिग बॉस जिंकल्यानंतर अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर सूरज आज अजित पवारांना भेटला. भेटीचं कारणही खास होतं. ते म्हणजे विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाला त्यातच अजित पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्री बनले.
बिग बॉस मराठी सीजन 5 गाजवणारा आणि विजेतेपदावर नाव कोरणारा सूरज चव्हाण याने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. बिग बॉस मराठी हा शो जिंकल्यानंतरही सूरज चव्हाणचे पाय अद्याप जमिनीवरच असल्याचे पाहायला मिळत असून त्याच्यातील साधेपणा आजही कायम आहे. सूरज चव्हाण हा मूळचा बारामतीचा असलेल्या त्याने बिग बॉस जिंकल्यानंतर अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर सूरज आज अजित पवारांना भेटला. भेटीचं कारणही खास होतं. ते म्हणजे विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाला त्यातच अजित पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्री बनले. याच विजयानंतर अभिनंदन करण्यसाठीच सूरज चव्हाणने पुन्हा दादांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, अजित पवार यांनी सूरजच्या घरासंदर्भातही विचारपूस केली आणि पुढील 9 महिन्यात सूरज याचं घर पूर्ण होईल असं आश्वासन देखील अजित पवार यांनी त्याला दिलं. या भेटीनंतर सूरज चव्हाण म्हणाला, ‘अजित दादांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मला कधीपासून त्यांना भेटायचं होतं, त्यांच्या भेटीसाठी मी आतूर झालो होतो. अखेर आज ही भेट झालीच. त्यांना उपमुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा देण्यासाठी आज आलो होतो. मी आज त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी माझं घर बांधणाऱ्या कंत्राटदाराला फोन केला होता. 9 महिन्यात घर बांधून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. दादांचा शब्द आहे तो, तो शब्द ते पूर्ण तर करणारंच’, असं म्हणत देव माणूस आहेत अजितदादा आहे, अशा शब्दांत त्याने अजित पवारांचे कौतुक केलं