Ulhasnagar | उल्हासनगरात उघड्या चेंबरमध्ये पडला बाईकस्वार, घटना सीसीटीव्हीत कैद
शहरात आधीच खड्ड्यांमुळे अपघात वाढलेले असताना आता चक्क एका उघड्या चेंबरमध्ये दुचाकीस्वार पडल्याची घटना घडलीये. अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
उल्हासनगर : शहरात आधीच खड्ड्यांमुळे अपघात वाढलेले असताना आता चक्क एका उघड्या चेंबरमध्ये दुचाकीस्वार पडल्याची घटना घडलीये. अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 3 भागात श्यामसुंदर सोसायटी आहे. या सोसायटीच्या समोरच एक चेंबर गेल्या काही दिवसांपासून उघडे पडले आहे. याच चेंबरमध्ये एक दुचाकीस्वार पडला. सुदैवानं तो चेंबरच्या आत पडला नाही म्हणून त्याचा जीव वाचला. अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याच्या गाडीचं मोठं नुकसान झालंय.
Latest Videos