कौठेवाडी गावातील बिरोबाच्या यात्रेत अनोखी परंपरा; पेटत्या कठयांचा थरार

कौठेवाडी गावातील बिरोबाच्या यात्रेत अनोखी परंपरा; पेटत्या कठयांचा थरार

| Updated on: May 09, 2022 | 1:04 PM

नवसपुर्तीसाठी पेटलेले लााल निखाऱ्याचे तेवत असलेले कठे अर्थात माठ डोक्यावर घेऊन बिरोबा महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा मारण्याची अनोखी परंपरा या गावात आहे.

अहमदनगर जिल्हायतील अकोले तालुक्यातील  कौठेवाडी या गावातील बिरोबाची यात्रा (Biroba Yatra) कठ्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. नवसपुर्तीसाठी पेटलेले लााल निखाऱ्याचे तेवत असलेले कठे अर्थात माठ डोक्यावर घेऊन बिरोबा महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा मारण्याची अनोखी परंपरा या गावात आहे.  मातीचे हे पेटते माठ घेऊन भक्त बिरोबाच्या मंदिराला फिरे मारत असतात. अक्षय तृतीयेनंतरच्या येणाऱ्या पहिल्या रविवारी ही यात्रा भरते.  यात्रेच्या वेळी हा थरारक अनुभव पाहायला मिळतो.  आज देखील ही परंपरा जपली जातेय.

Published on: May 09, 2022 01:04 PM